Advertisement

तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून महिलेची आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 28/03/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२८ (प्रतिनिधी): शहरातील मांडवा रोडवरील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि.२८) रोजी सकाळी घडली आहे. या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली .

 वैशाली सुनील चिकटकर रा.जवळगाव ता. अंबाजोगाई असे मयत महिलेचे नाव आहे. वैशाली चिकटकर या आपल्या कुटुंबासह मुलांच्या शिक्षणासाठी येथे भाड्याने राहत होत्या. आज शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. या भीषण घटनेत त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यु झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement