Advertisement

वाळू वाहतूकदारांना दंडाची रक्कम ७ कोटी ९१ लाखाच्या घरात 

प्रजापत्र | Saturday, 07/02/2026
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील दोन वाळू घाटांवरून वाळू वाहतूकदारांनी एका पावतीवर अनेक फेऱ्या मारल्याचे प्रकरण समोर आले होते. अशा प्रकारे ७८ वाहनांनी तब्बल ३०१ फेऱ्या अधिक मारल्याचा दावा प्रशासनाने केला असून ७८ वाहनांना ७ कोटी ९१ लाखाचा दंड आकरणीच्या नोटीस उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी बजावल्या आहेत.

   मागच्या चार दिवसांपासून बीडमध्ये वाळू वाहतूकदारांवर एका पावतीवर अनेक फेऱ्या करून वाळू तस्करी प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार सावरगाव आणि बोरगाव या दोन वाळू घाटांवरील वाहनांची माहिती घेण्यात आली. गौणखानिज प्रणालीनुसार या वालूघाटांसाठी १२३ ईटीपी पास देण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात येथून ४२४ फेऱ्या झाल्या आहेत. म्हणजे सुमारे ३०१ फेऱ्या वाळू तस्करीच्या झाल्याचा प्रशासनाचा दावा असून त्यासाठी आता १६८६ ब्रास वाळू तस्करीपोटी सुमारे ७ कोटी ९१ लाखाच्या दंडाच्या नोटीस ७८ वाहनधारकांना बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement