Advertisement

अवैध दारू विक्रीवर कारवाई 

प्रजापत्र | Saturday, 25/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२५(प्रतिनिधी):बीड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत कारंजा रोड परिसरातून चोरट्या मागनि विक्रीसाठी नेण्यात येत असलेला विदेशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारंजा रोड परिसरात सापळा रचला. यावेळी विक्रीसाठी नेण्यात येत असलेली सुमारे ४० हजार रुपयांची विदेशी दारू तसेच १ लाख रुपये किमतीची मोपेड असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक शेख समीर, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम तसेच बीड शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.शहंशा सय्यद, गहिनीनाथ बावणकर, राजेंद्र मुंडे, पो.अं शेख इलियास, राम पवार आणि मंगेश शिंदे यांनी केली आहे .या कारवाईमुळे बीड शहरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

Advertisement

Advertisement