Advertisement

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले 

प्रजापत्र | Friday, 09/01/2026
बातमी शेअर करा

बीड दि.९(प्रतिनिधी): शहरातील (Beed)शांताई हॉटेलच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना अज्ञात दोघांनी दुचाकीवर येत एका महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण असा एकूण ६५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.७) रोजी (Crime)भरदिवसा घडली असून अज्ञात आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

     बीड (Beed)जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून ज्योती समिर शिंदे (शेलार) वय ३८ रा.श्रद्धा निवास,इंडिया बँक कॉलनी,जालना रोड बीड ह्या त्यांच्या घराकडे शहरातील शांताई हॉटेलच्या बाजूच्या रस्त्याने पायी जात असताना घोडके हॉस्पिटल समोर अज्ञात दोघांनी दुचाकीवर येत त्यांच्या गळ्यातील   मिनीगंठण अंदाजे किंमत ६५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.७) रोजी सायंकाळी ४:४० च्या सुमारास भरदिवसा घडली असून अज्ञात दोन आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ज्योती शिंदे यांच्या (Crime)फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement