Advertisement

शिवशाही बस रिक्षाचा अपघात !

प्रजापत्र | Friday, 01/08/2025
बातमी शेअर करा

परळी दि.१(प्रतिनिधी): बीडहून(Beed) नांदेडकडे निघालेल्या शिवशाही एसटी बसचा आणि रिक्षाचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना परळी नजीक पांगरी कॅम्प येथे आज गुरुवार (दि.१) रोजी सकाळी साडे आठच्या (Accident)सुमारास घडली.
     बीडहून परळी मार्गे नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसची आणि रिक्षाची समोरासमोर सकाळी साडे आठच्या सुमारास धडक झाली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.शेतात कामासाठी महिलांना सोडून हा रिक्षा परळीकडे निघाला होता त्यावेळी पांगरी कॅम्प नजीक हा अपघात घडला अपघातानंतर तासभर बीड परळी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीणचे (Police)पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

Advertisement