Advertisement

नारारणगडाचे विश्‍वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी 

प्रजापत्र | Tuesday, 08/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.७( प्रतिनिधी) : मागच्या काही दिवसांपासून धाकटी पंढरी म्हणून मान्यता असलेल्या (Narayangad)नारायणगडाबद्दल वेगवेगळे वाद सुरु आहेत. आतातर रेथील विश्‍वस्त मंडळच बरखास्त करावे अशी मागणी करत एका भक्ताने  बीडच्या सहाय्यक धर्मादार आरुक्तांकडे केली आहे. 
             बीड (Beed)जिल्ह्यातील महत्वाचे क्षेत्र असलेल्रा नारायणगडाबद्दल सध्या वेगवेगळे वाद सुरु आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भक्त असलेल्या नारायणगडाबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत असल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. त्यातच आता गडाच्या जागा विक्री करताना विश्‍वस्त मंडळाने धर्मादाय विभागाची परवानगी घेतली असल्याचे सांगत एका भक्ताने थेट विश्‍वस्त मंडळ बरखास्तीची मागणी करत सहाय्यक आरुक्तांकडे धाव घेतली आहे. रात आता धर्मादाय  विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Advertisement

Advertisement