अंबाजोगाई दि.१३ (प्रतिनिधी): तालुक्यातील घाटनांदूर येथे आज शुक्रवार (दि. १३) रोजी सकाळी ९ च्या सुमारास करंट लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत तरुणाचे नाव धनंजय राजाभाऊ जाधव (देशमुख) वय २४ असून तो घाटनांदूर येथील रहिवासी होता. रोजच्याप्रमाणे तो सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. यावेळी शेतामध्ये असलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे त्याला जोराचा झटका बसला. यात तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बातमी शेअर करा