Advertisement

प्रेयसीच्या मदतीने त्याने जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे संपवलं 

प्रजापत्र | Friday, 11/04/2025
बातमी शेअर करा

 सोलापूर  : प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची घटना अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील सिन्नूर (sinnur) येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे.  या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात (Akkalkot South Police Station) रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

       अधिक माहिती अशी कि, रमेश कळसकोंडा (Solapur Crime News) याचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण होते. त्या प्रेम प्रकरणाला आई भिमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता. रमेश कळसकोंडा आणि आई भिमाबाई यांच्यात या प्रकरणामुळे सतत वाद होत होते. त्यामुळेच प्रेयसी सोबत संगनमत करून रमेश कळसकोंडा याने गावाजवळील शेतात भिमाबाई कळसकोंडा यांचा त्यांच्यात साडीने गळा आवळून खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

   

Advertisement

Advertisement