अहमदनगर- गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आपली राजकीय फायदा लक्षात घेऊन वेगवेगळे नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. यामध्ये निलेश लंके यांचादेखील समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवारयांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ते जाहीर सभेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निलेश लंकेंनी बोलावली बैठक
निलेश लंके यांनी २९ मार्च रोजी सुपा-अहमदनगरच्या मार्गावर एका बैठकीचे आयोजन केले आहे. लंके यांनी पारनेर-नगर विधानसभआ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सभासद आणि हिंतचिंतकांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लंके या बैठकीत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार?
गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशा हालचालींनाही सध्या वेग आला आहे. निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लंके कोणत्याही क्षणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात. तसे झाल्यास लंके यांना अहमदनगरची उमदेवारी दिली जाऊ शकते. याच कारणामुळे लंके आजच्या या बैठकीत आपल्या आमदारीकच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात. त्यामळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

