Advertisement

अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक

प्रजापत्र | Monday, 16/11/2026
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत आतापर्यंत अनेकदा पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आता आज (१६ नोव्हेंबर) पुन्हा एकदा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत अनेक खुलासे केले आहेत.

गेल्या साडेनऊ महिन्यानंतरही अजित पवार यांचा अपघात की घातपात? हे का समजू शकलेलं नाही? आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही? असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे मफलरमॅनबाबत सवाल विचारत होते. आता आज रोहित पवार यांनी नेमकं मफलरमॅन कोण आहे? याबाबत एक फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी मफलरमॅन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो पत्रकार परिषदेत दाखवला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

 

रोहित पवार ‘मफलरमॅन’बाबत काय म्हणाले?

“या फोटोत असणारी व्यक्ती या अपघातासाठी जबाबदार आहे असं नाही. मात्र, व्हीएसआरला वाचवणारा व्यक्ती आणि व्ही. के. सिंगला वाचवणारा व्यक्ती, ज्याच्या कंपनीच्या विमानाच्या माध्यमातून अजित पवार यांचा अपघात तरी झाला असावा किंवा घातपात तरी झाला असावा. अशा व्यक्तीला वाचवणारा व्यक्ती कोण आहे? तर ज्याला तुम्ही सगळे मफलरमॅन म्हणता. मग तो मफलरमॅन नेमकं कोण?”, असं म्हणत रोहित पवार यांनी मफलरमॅन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो पत्रकार परिषदेत दाखवला आहे.

Advertisement

Advertisement