Advertisement

अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई 

प्रजापत्र | Friday, 11/09/2026
बातमी शेअर करा

 नेकनूर दि.११(वार्ताहार): मांजरसुंबा येथे अवैध गुटखा वाहतुकीवर पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने कारवाई करत २ लाख ६८ हजार ६ २८ रुपयांचा गुटखा,वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
 बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे अवैध गुटख्याची वाहतूक होत असलायची माहिती पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारे कारवाई करुन २ लाख ६८ हजार ६ २८ रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब राम पडुळे, रा. औरंगपूर ता.बीड याच्या विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील  कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement