Advertisement

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Tuesday, 08/09/2026
बातमी शेअर करा

परळी दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप एका २७ वर्षीय युवकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर माहितीनुसार, परळी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप रविवार (दि.६)रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement