Advertisement

भरदिवसा दागिने लुटणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

प्रजापत्र | Monday, 07/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.७(प्रतिनिधी): शहरातील बार्शी रोड परिसरातील मोरया मल्टीसर्विसेस दुकानात घुसून भरदिवसा सोन्याचे दागिने लुटून पसार झालेल्या महिला-पुरुष आरोपींच्या  बीड शहर पोलिसांनी काही तासातच आवळल्या मुसक्या.  

  बीड शहरातील बार्शी रोड परिसरातील मोरया मल्टी सर्विसेस येथे अनोळखी महिला व पुरुषाने प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीने दुकानाबाहेर नेऊन त्याच्याकडील अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन शुक्रवार (दि.४) रोजी पोबारा केला होता. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बीड शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी समीर खान याच्यासह एका महिला आरोपीला रविवार (दि.६) रोजी रात्री ताब्यात घेतले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख  पोनि विनोद घोळवे यांच्या दर्शनाखाली पोउपनि गणेश कुमावत, पोहेकॉ शहेंशाह सय्यद,गोवर्धन सोनवणे,राजेंद्र मुंडे,सचिन अलगट,पो.अं इलियास शेख, मंगेश शिंदे,श्री.दराडे, बापू गायकवाड आणि सचिन वाघमारे यांनी केली.

Advertisement

Advertisement