मुंबई : दूध, पनीर, वेगवेगळ्या पदार्थांतील भेसळीनंतर आता तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. आम्ही 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत काम करत आहोत. त्याच अनुषंगाने पुढची महत्वाची ऑर्डर काढत आहोत, एडिबलं ऑईलबद्दल हा आदेश असल्याचे सांगत आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाचा मुद्दा हाती घेतला आहे. खाद्यतेलाबद्दल जे स्टॅण्डर्ड आहेत, त्याची तपासणी आता केली जाईल, या क्षेत्रामध्ये आता काम केलं जाईल, अशी माहिती मुंढेंनी दिली. तसेच, खाद्य तेलामध्ये (Oil) स्टँडर्ड तपासणीनंतर भेसळ अनियमितता प्रकारच्या काही गोष्टी सापडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नोंदणी न केलेल्या काही खाद्य तेल उत्पादक कंपन्या आम्हाला मिळाल्या आहेत, खाद्य तेलाची भेसळ करण्याचा प्रकार आम्हाला मिळाला. मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केलं जाताय, याची परवानगी नाही. मुदत संपलेल्या तेलाच्या परत रिपॅकिंग केल्याचंही निदर्शनास आल्याची माहिती मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली.खाद्यतेलाच्या स्टँडर्डसंदर्भाने आपण कपलायन्स ऑर्डर काढत आहोत. खाद्यतेलाच्या संदर्भात काम करणाऱ्या आस्थापनाना विविध मानके नियम लागू होतात. खाद्य तेलाच्या उद्योगात काम करणाऱ्या सर्वांना आदेश लागू असेल. किराणा दुकानदार ऑनलाइन विक्रेते, उत्पादनापासून ते विक्री करणाऱ्या प्रत्येकाला आदेश लागू असेल. त्यासाठी, ४९६ सेंट्रल लायन्सन रजिस्टर आहेत, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेतून दिली. खाद्यतेलाची विक्री सुट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम आधीपासून आहे. पॅकेजिंगमध्येच खाद्य तेलाची विक्री केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे स्वरूपात तेल घेऊ नये, असे आवाहन तुकाराम मुंढेंनी केले.
तळणीचं तेलं नको, मोहरी तेलात मिश्रण नको
मोहरी तेल १०० टक्के मोहरी तेल म्हणून विकावं लागेल, त्याचं मिश्रण करता येणार नाही, सध्या सुट्टे तेल मोठ्या प्रमाणावर विकलं जाताय, हे तेल कधी आणि कुठून आलं याचे स्रोत माहिती नसतात. हे सुरक्षित नाही, यामुळेच विषबाधा होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा खाद्य तेलाचे टिन डब्बे रियुज केले जातात, पण हे करता येत नाही. तरीही तसा वापर केला जातोय. तसेच, तळणीचा तेलाचा वापर वारंवार केला जातोय. हॉटेल्समध्ये केला जातोय, त्याच त्याच तेलाचा वापर हॉटेलमध्ये केला जातो. त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतोय, हे आता करता येणार नाही, असा शब्दात तुकाराम मुंढेंनी हॉटेलवाल्यांना इशारा दिलाय.
विक्रेत्यांना ७ वर्षांपासून आजन्म शिक्षा,नागरिकांनाही आवाहन
खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केलं तर ७ वर्षांपासून आजन्म शिक्षा आहे.भेसळ केल्यास १० लाखापर्यत दंड आहे,दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी १० लाखापर्यत दंड आहे,अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी दिली. सुट्टे तेल विकत घेऊ नका, पॅकेज तेल आहे तर लेबल बघा, सील बंद आहे का चेक करा, त्याची मुदत बघा,एक्सपायरी डेट बघा.तळनीचं तेल वारंवार घरी सुद्धा वापरू नका आणि हॉटेलमध्ये सुद्धा वापरलं जात असेल तर तिथे खाऊ नका. हा इशू फक्त फसवणुकी पुरता मर्यादित नाही, आरोग्यावर याचा परिणाम होतोय. मेंदू विकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळवतात, आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल आहे,अशी माहिती देत आवाहन तुकाराम मुंढेंनी केलं आहे.

