पाटोदा दि.३(प्रतिनिधी): निरगुडीच्या बाजाराला दुचाकीवरून निघालेल्या सराफा व्यापाऱ्याला चारचाकीतून पाठलाग करत आलेल्या चोरट्यांनी बॅगमधील ८,८०,४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार(दि.२) रोजी सकाळी ०९:३० वाजता घडली.
शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील सोन्या-चांदीचे व्यापारी सतीश उदावंत (वय ४७) हे रविवारी दुचाकीवरून निरगुडी,ता.पाटोदा येथे सकाळी ०९:३० वाजता बाजारात जात असताना पाठलाग करून स्विफ्ट कारणे आलेल्या चोरट्यांनी निरगुडी जवळील पुलावर त्यांच्या दुचाकीला धडक देऊन जखमी करत त्यांना दमदाटी केली.त्यांच्याकडील सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन चोरटे फरार झाले.त्या बॅगेत अंदाजे ६ लाख रुपयांचे चांदीचे दागिने,२ लाख ८० हजारांचे २० ग्रॅमचे सोन्याचे दागिने,४०० रुपयांची बॅग असा एकूण ८,८०,४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी सतीश उदावंत यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोउपनि मस्के या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

