दिल्ली : गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मागणीला यश आले असून, धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आपण करुन दाखवलं”, असे म्हणत दिपके आणि आंदोलकांनी जंतर मंतरवर जल्लोष केला. “धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हे काय म्हणत होते की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत”, अशी प्रतिक्रिया दिपकेंनी दिली.
बातमी शेअर करा

