Advertisement

  'वर्षा' निवासस्थानी सुरक्षा वाढवली

प्रजापत्र | Friday, 24/07/2026
बातमी शेअर करा

 मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या क्रॉक्रोज जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय बंगल्यावर जास्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांची आणि संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. परिसरात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement