Advertisement

अवैध दारू,जुगारावर शिरूर पोलिसांची कारवाई 

प्रजापत्र | Sunday, 28/06/2026
बातमी शेअर करा

 शिरूर कासार दि.२८(प्रतिनिधी):तालुक्यात तीन ठिकाणी अवैध दारू,जुगारावर शिरूर पोलिसांची कारवाई शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी कारवाई करत १,०२,९१० रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला असून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      शिरूर कासार तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले असून सपोनि राजेश गडवे यांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून शिरूर शहरात अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच कारवाई केली असून दत्तू बन्सी खिवनसरा,अशोक आत्माराम गर्जे रा.गोमळवाडा ता.शिरूर कासार या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ किंग प्रेशर कंपनीच्या बॉटल अंदाजे किंमत २४०० रुपये व एक टीव्हीस कंपनीची स्कुटी अंदाजे किंमत २५,००० रुपये असा एकूण २७,४०० रुपयांचा मुद्देमाला जप्त केला.तसेच पाडळी येथे अवैध दारूची विक्रीवर कारवाई केली यात सतीश रावसाहेब हांगे यास ताब्यात घेत  त्याच्याकडून देशी दारूच्या ३७ बॉटल असा एकूण २,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर लोणी येथे जुगार अड्यावर कारवाई करत सात जणांना ताब्यात घेत त्याच्याकडून  ७२,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या तीन ठिकाणच्या कारवाईत एकूण १,०२,९१०  रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला असून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.सदरील कारवाई सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गडवे  पोह.अनिल तांदळे,दादासाहेब उबाळे,मुकेश दहिफळे,सचिन डीडूळ,बाळासाहेब सुरवसे,सोपान विधाते,सतीश खाडे,रवींद्र नागरगोजे यांनी केली.  

Advertisement

Advertisement