Advertisement

 नसरापूर प्रकरणात आरोपी कांबळे दोषी

प्रजापत्र | Thursday, 25/06/2026
बातमी शेअर करा

 पुणे: महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला (६५) दोषी ठरवले आहे. विशेष न्यायालयात बंद दाराआड (इन कॅमेरा) या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी झाली. कांबळेला २९ जून रोजी शिक्षा सुनावली जाणार असून, न्यायालय आता कांबळेला काय शिक्षा ठोठावणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे.

Advertisement

Advertisement