Advertisement

नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  

प्रजापत्र | Friday, 12/06/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : पेपरफुटी प्रकरणानंतर जाहीर झालेल्या नीट फेरपरीक्षेसाठी (Re-Exam) विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही माहिती दिली आहे. आता परिक्षेचा सुधारित वेळ दुपारी २:०० ते ५:१५ या वेळेत (एकूण १९५ मिनिटे) होणार आहे. तर प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून रफ कामासाठी पानांची संख्या २ वरून थेट ४ करण्यात आली आहे. ही फेरपरीक्षा २१ जून रोजी घेतली जाणार आहे. नीटचा पेपर सोडवण्यासाठी अधिकची पंधरा मिनिटे मिळणार आहेत, २१ जूनच्या परीक्षेपूर्वी एनटीएने हा मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा कालावधी १८० मिनिटांऐवजी १९५ मिनिटांचा असणार आहे, परीक्षेसाठी दुपारी दोन ते सव्वा पाच पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. रफ कामांसाठी प्रश्नपत्रिका मध्ये अतिरिक्त जागा दिली जाईल अशी माहिती आहे. 

   २१ जून रोजी एनटीएकडून नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. ही फेरपरीक्षा आहे. पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना यापूर्वीच शारीरिक मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे जी आगामी परीक्षा २१ जून रोजी होणार आहे, त्या परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पंधरा मिनिटं जास्तीचे मिळणार आहेत अशी माहिती एनटीएकडून दिली गेली आहे, अपवादात्मक परिस्थितीत होत असलेली ही परीक्षा आहे, त्यामुळे यामध्ये वेळ वाढवून देण्यात आला आहे, शिवाय रफवर्क करण्याशिवाय अतिरिक्त जागा प्रश्नपत्रिका मध्ये देण्यात आली आहे
 

Advertisement

Advertisement