पुणे : येथील खराडी भागात गॅस गळतीमुळे झालेल्या प्रचंड स्फोटात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यु झाला.
खराडीतील खांदवेनगर येथील फॉच्र्युन सिटी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी सव्या नऊच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली, मिलेंडर बदलत असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि परळी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. विष्णू मुंजाजी गिते (वय ६०), पांडुरंग विष्णू गिते (वय ३५) आणि वृंदावनी विष्णु गिते (वय ५५, सर्व सध्या रा. खांदवेनगर, खराडी, पुणे, मूळ रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी या भीषण अपघातात मृत्यु झालेल्या सदस्यांची नावे आहेत. या दर्घटनेत राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय ५ वर्षे) या किरकोळ जखमी झाल्या असून त्या बालंबाल बचावल्या आहेत. हे कुटुंच कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

बातमी शेअर करा
