Advertisement

 शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता

प्रजापत्र | Tuesday, 02/06/2026
बातमी शेअर करा

मुंबई : गेल्या वर्षी विविध कारणांमुळे राज्यातील  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारने शेतकऱ्याांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र या कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार,याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क  लढवले जात आहेत. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला  राज्य सरकारच्या  मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीच्या घोषणेनंतर आज या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने कर्जमाफीच्या योजनेला दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील शेतकऱ्यांचे दोन  लाख  रुपयांपर्यंतचे माफ होणार असून,  ही संपूर्ण कर्जमाफीची योजना  ही ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची असणार आहे.मात्र सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कर्जमाफीची तातडीने घोषणा करण्यात आलेली नाही. आता सहकार विभागाकडून या कर्जमाफी योजनेबाबत अटीशर्तींचतं परिपत्रक काढण्यात येणार  आहे. त्यानंतर या योजनेबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.  

Advertisement

Advertisement