मुंबई - सत्तेत आल्यास पेट्रोलडिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगमाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच या दरवाढीविरोधात २६ मेपासून काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा

