Advertisement

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून महिला प्राध्यापक अटकेत

प्रजापत्र | Saturday, 16/05/2026
बातमी शेअर करा

पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केली. मांढरे ही परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात ती सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली.

      मनीषा मांढरे ही वरिष्ठ प्राध्यापिका आहे. ती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतीशास्त्र, तसेच प्राणीशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या घरी बोलविले होते. तेथे प्रा. मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती तिने दिली होती. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्ात आली.‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरे ही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला सीबीआयने अटक केली.

Advertisement

Advertisement