Advertisement

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले विजयी

प्रजापत्र | Monday, 04/05/2026
बातमी शेअर करा

नगर : राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली आहेत. भाजपाचे आ.शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.

Advertisement

Advertisement