Advertisement

आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी

प्रजापत्र | Saturday, 02/05/2026
बातमी शेअर करा

पुणे  : नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नसरापूर येथील घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी सरकार न्यायालयात करणार आहे.

     दरम्यान, या प्रकरणानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधी रोहित पवार यांनी देखील आरोपी यापूर्वी दोन वेळा जामिनावर बाहेर आल्याचा मुद्दा उपस्थित करत कठोर कायद्याची मागणी केली होती. नसरापूर परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement