मुंबई : शिवसेनेचे (शिंदे) आ.संजय गायकवाड हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असतात. आता आ.गायकवाड हे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरून वादात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर संजय गायकवाड यांनी माफी मागितली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आ.संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
बातमी शेअर करा

