दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षात (आप) उभी फूट पडली असून, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह तीन खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाची वाढती जवळीक पाहता पक्षाने त्यांना पदावरुन हटवल्याचे स्पष्टीकरण आपने दिले होते. चड्ढा भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरु होता मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, चड्ढा यांनी पत्रकार परिषदेतून भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि पर्यायाने ‘आप’ला हा मोठा धक्का मानला जात आहे.
बातमी शेअर करा

