Advertisement

लाडकी बहिण योजने बाबत आदिती तटकरेंनी दिले महत्वाचे अपडेट….

प्रजापत्र | Friday, 27/03/2026
बातमी शेअर करा

मुंबई : लाडकी बहिण योजनेबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचे अपडेट दिले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास आजपासून सुरु होणार आहे.

   फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पुढील दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रक्रीया महिला व बाल विकास विभागाने सुरु केली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, ज्या लाभार्थी महिलांची ई केवायसी प्रक्रीया पूर्ण झालेली नाही, त्यांनी ३१ मार्च पूर्वी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement