Advertisement

भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा

प्रजापत्र | Saturday, 21/03/2026
बातमी शेअर करा

मुंबई : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

 

     याच भोंदू बाबा अशोक खरात बरोबर राज्यातील आणखी काही नेत्यांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत ‘भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा’, अशी मोठी मागणी केली आहे. तसेच राज्यातील राजकारण आणखी किती किती खालच्या स्तरावर नेणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement