दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजेच मतमोजणी होणार आहे. ३० मार्च २०२६ रोजी या निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना जारी : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : ६ मे २०२६

