Advertisement

तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Friday, 20/02/2026
बातमी शेअर करा

 परळी दि.२० (प्रतिनिधी): येथील वादग्रस्त असलेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना २० हजाराच्या लाच प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे.या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे. 

    परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपत प्रमाणपत्र) काढण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती,यानंतर २० हजारांमध्ये तडजोड झाली. या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीड एसीबीने सापळा रचत ही कारवाई करण्यास सुरुवात केली. परंतु तक्रारदाराच्या हालचालीनंतर तहसीलदार मुंडे यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. परंतु या दरम्यान एसीबीकडे अनेक पुरावे आल्यामुळे एसीबीने त्यांना ताब्यात घेत पुढील प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (Beed)असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे.  

Advertisement

Advertisement