Advertisement

 हर्षवर्धन सपकाळांकडून एक पाऊल मागे!

प्रजापत्र | Tuesday, 17/02/2026
बातमी शेअर करा

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात केवळ टिपू सुलतानची तसबीर भिंतीवर लावलेला फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यावरुन वाद सुरु झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत तुलनात्मक विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन भाजपनं त्यांना टार्गेट करत रान पेटवलं. पुण्यात काँग्रेसभवनावर केलेल्या आंदोलनादरम्यान दगफेकीची घटना घडली त्यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पत्रकार मंडळी जखमी झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपकाळांवर सडकून टीका केली. इतरही लोक सोशल मीडियातून हा विषय धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यानं अखेर हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोस्ट करत लांबलचक पोस्ट लिहीत आपली बाजू मांडली आणि दिलगिरीही व्यक्त केली.

Advertisement

Advertisement