छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा फक्त एका मताने विजय झाला. सचिन गरड यांचा अवघं एक मत जास्त मिळवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला.
एक मताने निवडून आलेल्या सचिन गरड यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वाळू माफियांच्या आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो, जनतेने मी सामान्य माणूस असतानाही निवडून दिले. त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली तर झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली, अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली
बातमी शेअर करा

