Advertisement

 शरद पवार यांची तब्येत बिघडली

प्रजापत्र | Monday, 09/02/2026
बातमी शेअर करा

पुणे : राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

 सोमवारी (9 फेब्रुवारी) सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ."

Advertisement

Advertisement