बीड दि.४ (प्रतिनिधी)-पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या अवैध धंद्यांवरील कारवाईचे सत्र अजूनही सुरु असून पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टेम्पोतुन वाळूची चोरटी वाहतूक होत असताना ते वाहन कारवाईत ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत २० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पूजा पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुक छुप्या पद्धतीने सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंदफना नदीपात्रात पूजा पवार यांचे लक्ष्य होते.त्यानुसार रविवारी (दि.४) सकाळी ७.३० वाजता अशोक लेलँड टेम्पो (एम.२३ ए.यु.४८७१) मधून गुंदागाव ते ईट फाटा रोडवर पहाटे टेम्पोमध्ये अंदाजे २ ब्रास वाळू घेऊन जात असताना पीएसआय माधव काटकर,सचिन आगलावे यांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात वाळू आढळून आल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात वाल्मिक बाबासाहेब पतंगे (वय-४२,नांदलगाव,ता.बीड) यावर गुन्हा दाखल केला.या कारवाईत २० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पूजा पवार यांच्या कारवाईमुळे आता माफियांचेही धाबे दणाणले आहेत.

बातमी शेअर करा
