मुंबई: बॉलिवूडचे 'हि-मॅन' अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , आणि मुलं, नातवंड असा गोतावळा आहे.
बातमी शेअर करा

