Advertisement

पंजाब सरकार सारखी शेतकऱ्यांना मदत करावी

प्रजापत्र | Wednesday, 24/09/2025
बातमी शेअर करा

धाराशिव  – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके नष्ट झाली, घरांची पडझड झाली आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न हिरावले गेले आहे. अशा कठीण परिस्थितीत आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्याची बातमी समजताच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, या दौऱ्यातून ठोस मदतीची घोषणा व्हावी, अशी शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केलंय कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी हे त्यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमाद्वारे केलंय.

 पंजाब सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति एकर २० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मग महाराष्ट्राचे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार शेतकऱ्यांसाठी अशीच मदत जाहीर करू शकत नाही का? राज्याच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी किमान पंजाबप्रमाणे मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील करत आहेत.

"आज शेतकऱ्यांच्या नजरा सरकारकडे लागलेल्या आहेत. जर दौऱ्यातून ठोस मदतीची घोषणा झाली नाही, तर हा दौरा केवळ फोटो सेशन ठरेल," 

शेतकरी वर्गाला विश्वास आहे की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे संकट गंभीरतेने घेत प्रति एकर वीस हजार रुपयांची नुकसानभरपाई तातडीने जाहीर करतील असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement