इंदापूर: लाडक्या बहिणी बोगस तसेच अनेक ठिकाणी घोटाळे केले जात आहेत. लाडकी बहिणीमध्ये काय निकष लावून अर्ज भरले आणि काय निकषाने रद्द केले, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असा प्रश्न खा.सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
खा.सुळे म्हणाल्या, ४ हजार ८०० कोटी रुपयांमध्ये काय-काय झालं असतं. सरसकट कर्जमाफीला याचा किती आधार मिळाला असता.त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.सरकारने याची पारदर्शक चौकशी करावी.योजना बंद करून प्रश्न सुटत नाहीत, त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत.लाडक्या बहिणी तुमच्या खरंच लाडक्या असतील तर निवडणुकीनंतर देखील तुमच्या बहिणी लाडक्या असायलाच हव्यात. लाडकी बहिणीमध्ये काय निकष लावून अर्ज भरले आणि काय निकषाने रद्द केले, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असा प्रश्न खा.सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.बहिणीसाठी सुधारणा करणे हे सरकारचा जो भाऊ आहे, त्याचे कर्तव्य नाही का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.