लातूर ११ (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज सोमवार (दि.११) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यासाठी ते विमानाने लातूरमध्ये डेरेदाखल झाले तेव्हा माजी मंत्री तथा (Dhananjay Munde) आ.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे स्वागत केले.
लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांचा भव्यदिव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.त्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे लातूर शहरात विमानाने डेरेदाखल झाले. या वेळी माजी मंत्री तथा आ.धनंजय मुंडे यांनी लातूर येथील विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. या वेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ.रमेश कराड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजापत्र | Monday, 11/08/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा