जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधील बसंतगड येथे (crpf)केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचे एक वाहन 200 फुट खोल दरीत कोसळून तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 15 जवान जखमी असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना कमांड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. माहिती देताना उधमपूरचे अतिरिक्त एसपी संदीप भट म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागातील कांडवाजवळ सीआरपीएफचे वाहन कोसळल्याने 3 जवानांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बातमी शेअर करा