पुणे : मैत्रिणीकडून पैसे आणि भेटीसाठी होणार्या ब्लॅकमेलिंगला (blackmailing) कंटाळून होतकरू तरुणाने गळफास लावून (suicide)आत्महत्या केली आहे. जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्या या तरुणाने नवले पुलाजवळील लॉजमध्ये जीवन संपवले आहे. याप्रकरणी आता संबंधित तरुणीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा.संतोषनगर कात्रज) असे तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी साक्षी बाळू वाघचौरे (वय २३, रा. अचानक चौक, वारजे) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त (blackmailing) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना नवले पुलाजवळील इंडिया गेट या लॉजवर ३० एप्रिल रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कार्तिक जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. गेल्या वर्षात त्याची व साक्षीची ओळख झाली होती. पुढे दोघांत मैत्री झाली. दरम्यान, घटनेच्या दिवशी साक्षी व कार्तिक नवले पुलाजवळील इंडिया गेट लॉजवर एकत्र थांबले होते. दोन तीन दिवसापासून ते थेतेच राहत होते. त्यादिवशी दोघांत वाद झाला. साक्षी बाथरुमध्ये गेली. तेव्हा कार्तिकने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात सुरूवातीला (suicide)अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, कार्तिकच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून (Pune police) पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
काय आहे तक्रारीत?
कार्तिकचा भाऊ तंगराजच्या तक्रारीनुसार, कार्तिक याला संबंधित मैत्रिणीबाबत माहिती विचारली होती. तेव्हा त्याने तंगराज यांना ती मैत्रीण असल्याचे त्याने सांगितले. त्यांचे फोन सुरू असत. दरम्यान, तक्रारदारांनी कार्तिकचा मित्र मयुर बांदल याला विचारले होते. त्यावेळी मयुरने सांगितले होते की, एप्रिल महिन्यात साक्षीला घेऊन येण्यासाठी तो व कार्तिक दोघे गेले होते. मला घर हवे, त्यासाठी तु मला पैसे दे असा तगादा तिने लावला होता. कार्तिकच्या सांगण्यावरून मी १५ लाख रुपये साक्षीला दिले होते. तर, कार्तिकचा दुसरा मित्र सिद्धेश आणि कालीदास यांनी देखील साडे दहा लाख रुपये दिले होते. नंतर भाऊ तंगराज यांनी पुन्हा कार्तिकला मैत्रिणीबाबत विचारणा केली. त्यावेळी कार्तिकने सांगितले, साक्षी वाघचौरे नावाची माझी मैत्रीण आहे. ती मला भेटण्यास आणि पैशांसाठी त्रास देत आहे. तिच्या त्रासाला मी कंटाळलो असून, तिच्या त्रासामुळे जीवाचे बरेवाईट करावे वाटते आहे. त्यावेळी आम्ही त्याची समजूत काढली होती. मात्र त्यानंतर कार्तिक याने ३० एप्रिल रोजी रात्री इंडिया गेट लॉजवर ओढणीने गळफास गेऊन आत्महत्या केली. कार्तिकच्या आत्महत्येस साक्षी कारणीभूत असल्याचा आरोप करत तंगराज यांनी पोलिसांत तक्रार दिली.