Advertisement

हसन मुश्रीफांच्या लेकाकडे 'गोकुळ'ची धुरा

प्रजापत्र | Friday, 30/05/2025
बातमी शेअर करा

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे 'गोकुळ'चा अध्यक्ष महायुतीचा व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. महायुतीचाच अध्यक्ष होण्यासाठी राज्यातील नेत्यांचा दबावही होता. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र असलेल्या नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

    सर्व सहमतीने जो काही निर्णय झालेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. सतेज पाटील यांनीच नाव दिलं आहे. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा चेअरमन आहे. आम्ही सर्वांचे आभार मानले असून भविष्यात गोकुळ वाढीसाठी शासन दरबारी प्रयत्न करावे लागणार आहेत. हम सब एक है अशी प्रतिक्रिया नावेद मुश्रीफ यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement