Advertisement

 भीषण अपघात मायलेकीचा जागीच मृत्यु 

प्रजापत्र | Monday, 19/05/2025
बातमी शेअर करा

  जालना: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीच्या (Jalna Accident) जवळील सौंदलगाव फाटा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यु झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली असून धुळ्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या कारला सौंदलगाव फाट्याजवळ कार पलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे लातूरचे असलेले चव्हाण कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगर येथे (Accident)वास्तव्यात आहे. हे कुटुंब काही कामानिमित्त लातूरकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री जवळील सौंदलगाव इथं पोहोचल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून (Accident)परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जखमींतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, गाडीचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा ही संभाव्य कारणे मानली जात आहेत.

मृतांची नावे: नुरवी अमरदीप चव्हाण (वय अडीच वर्षे),रोहिणी अमरदीप चव्हाण (वय ३० वर्षे)
जखमींची नावे:अमरदीप बाबूराव चव्हाण (वय ४० वर्षे),विश्रांती प्रदीप चव्हाण (वय २९ वर्षे),रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय २ वर्षे)

दरम्यान, धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही(Accident) महिन्यांत अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाहनांचा अतिवेग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याने वाहनचालकांनी वेगबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

Advertisement