Advertisement

दहावीचा निकाल जाहीर !

प्रजापत्र | Tuesday, 13/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं.

        यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे.

 

निकालाची विभागनिहाय टक्केवारी 
पुणे  : 94.81 टक्के 
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के 
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के 

निकाल कुठे पाहाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

Advertisement

Advertisement