दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रिमियर लीग (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI Suspended IPL 2025) मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना काल रद्द झाला होता. त्यामुळे आयपीएलवर स्थगितीचे ढग होते. अशातच आता आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय लवकर यावर अधिकृत घोषणा करेल. तसेच सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाईल. बीसीसीआय त्यांना सुरक्षितपणे परत पोहोचवेल याची खात्री करेल, अशी माहिती समोर आली आहे.
बातमी शेअर करा