Advertisement

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 05/05/2025
बातमी शेअर करा

 जळगाव: (Suicide)इयत्ता बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पाचोरा येथे सोमवारी (०५ मे २०२४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मयत तरुणाला परीक्षेत ४२ टक्के गुण मिळाले. त्यामुळे तो नैराश्यात होता, अशी  माहिती नातेवाईकांनी दिली.

            भावेश प्रकाश महाजन (१९, रा. एरंडोल), असे आत्महत्या केलेल्या (Student)विद्यार्थ्याचे नाव आहे. भावेशच्या दोन बहिणी पाचोरा येथे राहतात. उन्हाळ्याची सुटी असल्याने तो बहिणीकडे आला होता. ज्या बहिणीकडे तो थांबला होता,  बहिण पुणे येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली आहे.  दुपारी दोन (hsc result) वाजताच्या सुमारास दुसऱ्या बहिणीकडून त्याला जेवणाचा डबा आला. त्यावेळी भावेश घरात गळफास (Suicide)घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Advertisement

Advertisement