Advertisement

 यकृत निकामी झालेल्या पतीसाठी पत्नी ठरली देवदूत

प्रजापत्र | Sunday, 04/05/2025
बातमी शेअर करा

परभणी: काही दिवसांपूर्वी(Farmer) शेतकरी पतीचे यकृत पूर्णपणे निकामी झालं असल्याचं आरोग्य तपासणीत निष्पन्न झाले. आपल्या नवऱ्याचे प्राण संकटात सापडल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने आपले अर्धे यकृत देण्याचा निर्णय घेतला. यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी प्रक्रिया (Pune)पुण्याच्या एका नामांकित रुग्णालयात पार पडली. पत्नीने आपल्या जीवाची परवा न करता पतीचे प्राण वाचवण्यासाठी अर्धे यकृत दिल्याने या महिलेचे कौतुक होत आहे.

 

 

अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड (Farmer)तालुक्यातील मर्डसगाव येथे भास्कर वैजनाथ काळे व संगीता भास्कर काळे हे शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. भास्कर काळे यांचा पारंपरिक शेती हा व्यवसाय आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा वावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली आरोग्य तपासणी केली असता त्यांना कळाले की, आपले यकृत निकामी होत आहे. यकृत निकामी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यकृत प्रत्यारोपण केल्याशिवाय आपण वाचू शकत नाही, असे डॉक्टरांनी काळे यांना सांगितले.

भास्कर काळे यांचे बंधू अनंत काळे, मधुकर काळे व पुतण्या ज्ञानेश्वर काळे यांनी आपले अर्धे यकृत देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर पत्नी संगीता काळे यांनी देखील आपले यकृत देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी शेवटी संगीता काळे यांचे यकृत भास्कर काळे यांना देण्याचे निश्चित केले. यकृत प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येणार होता. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीतून मदत झाली. त्यानंतर २२ एप्रिल रोजी पुण्यातील डॉक्टर बिपिन विभुते, डॉक्टर जयश्री टासकर व डॉक्टर पाठक यांच्या टीमने सलग १४ तास शस्त्रक्रिया करत यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न केली. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आता भास्कर काळे यांच्यावर आलेले संकट टळले आहे.दरम्यान, भास्कर काळे यांच्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता संगीता काळे यांनी आपले अर्धे यकृत देऊन आपल्या पतीचे प्राण वाचवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Advertisement