Advertisement

लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली !

प्रजापत्र | Friday, 02/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यभरातील बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी जमा (Ladki bahin yojana)होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री (Aditi tatkare)आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे, या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

 

                 मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक्स पोस्टवरून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे".

"पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा  (Ladki bahin yojana)संकल्प अधिक दृढ केला जात आहे", असेही त्या म्हणाल्या.
 

Advertisement

Advertisement