Advertisement

राज्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार

प्रजापत्र | Friday, 02/05/2025
बातमी शेअर करा

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून मे महिन्यात यात आणखी भर पडणार आहे. मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ ते ४३ अंश सेल्सिअस तर नागपूर, अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

 

राज्यातील काही भागांत उष्ण व दमट हवामान असल्याने आज २ मे रोजी संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषकरुन मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुण्यात गेले काही (Maharashtra weather Update) दिवस पाऱ्याने चाळीशी पार केली आहे, मात्र आता ढगाळ वातावरण तयार झाले असून आज संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये देखील पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement